अक्कलकोट : प्रतिनीधी
येथे “गाव चलो अभियान” अंतर्गत संमधीत जबाबदार प्रमुखांनी केंद्र व राज्य शासनाचे लोकल्याणकारी योजनेचे माहिती शेवटच्या घटकातील शोषित पीडित वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी झटावे असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. अक्कलकोट शहरातील फोर पेटल्स या हॉटेल च्या सभागृहात अक्कलकोट विधानसभा वॉरियर्स, शक्ती केंद्र प्रमुख, शक्ती केंद्र प्रभारी, प्रमुख कार्येकर्ते यांचे बैठकीचे आयोजन करण्यात आलेहोते या आमदार कल्याणीशेट्टी बोलत होते.
सदर बैठक गुरुवारी रोजी “गाव चलो अभियान” नियोजन बैठकित ३६९ प्रमुख्याच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर आमदार सचिन कल्याणशेट्टी, सरचिटणीस शशिकांत चव्हाण, भाजप जिल्हा युवा प्रमुख सुदर्शन यादव, शिवानंद पाटील, मोतीराम राठोड,शिवशरण जोजन, आप्पासाहेब बिराजदार, उपस्थित होते.
या वेळी पुढे बोलताना आ. कल्याणशेट्टी म्हणाले, प्रमुखांनी प्रत्येक बुथवर जाऊन मुक्काम करणे आणि नागरिकांना घरकुल, मोफत गॅस, शेतकरी सन्मान योजना आशा विविध केंद्र व राज्य शासनाचे योजना सर्वसामान्य पर्यंत पोचवणे, लाभार्थ्यांची गाठीभेटी घेणे, प्रचार व प्रसार करणे कामी प्रत्येकाने झटावे असे आवाहन आमदार कल्याणशेट्टी यांनी केले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी महेश हिंडोळे विवेकानंद उंबरजे, परमेश्वर यादवाड, वंदना लोंढे, ज्योती उन्नद, सुरेखा राठोड, तनुजा जवळे, चंद्रकला करिमुंगी, राजकुमार झिंगाडे, प्रकाश पाटील, धनंजय गाढवे,विकास वाघमारे, दुधनी बाजार समितीचे चेअरमन सातलिंगप्पा परमशेट्टी, महीबुब मुल्ला, अणप्पा बाराचाऱी , विवेकानंद उंबरजे, आप्पासाहेब पाटील, शिवसिद्ध बुळा, परमेश्वर यादवाड राम होनराव, प्रभाकर मजगे, एडवोकेट दयानंद उंबरजे, सुनिल कळके, महादेव पाटील, इरेश अंबरे, सुरेखा राठोड, विश्राम गायकवाड, सुरेश नागोर दयानंद बमनळी सीताराम राठोड, प्रदीप पाटील, शिवकुमार चनशेट्टी, दयानंद बिडवे, नन्नु कोरबु, कांतु धनशेट्टी प्रदीप जगताप लखन झंपले राहुल काळे, आदीजण प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.