ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट : पण सुदैवाने आम्ही वाचलो !

जालना : वृत्तसंस्था

नाशिक दौऱ्यावर असताना माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला. तसेच अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही करण्यात आला, पण सुदैवाने आम्ही वाचलो, असा मोठा गौप्यस्फोट मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. अंतरवाली सराटी येथे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाचे तातडीने कायद्यात रुपांतर करावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे शनिवारपासून (१० फेब्रुवारी) पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं. उपोषणाला बसण्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावं अन् सग्या-सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. जोपर्यंत राजपत्रित अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही, असंही जरांगेंनी ठणकावून सांगितलं.
मनोज जरांगे यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना मोठा गौप्यस्फोट केला. नाशिक जिल्ह्यात दौरा करत असताना साल्हेर किल्ल्याजवळ माझ्यासोबत घातपाताचा प्रयत्न झाला. तसेच अंगावर गाडी देखील घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी त्या वाहनचालकाला ताब्यात घेतले होते, असं जरांगे म्हणाले. आम्ही साल्हेर किल्ल्याजवळ असताना अचानक एक पिकअप सारखी गाडी प्रचंड वेगात आली. ही गाडी आमच्या अंगावर आली असती तर आमचा भुगा झाला असता. पण एकाने जोराने आवाज दिल्याने लोकं उड्या मारून बाजूल पडले, असा थरारही जरांगे यांनी सांगितला. आम्ही अशा घटना सांगत बसत नाही, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी भुजबळ यांना लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!