शारीरिक व भावनिक विकास महत्वाचा : गटशिक्षणाधिकारी अरबाळे
तारामाता प्राथमिक शाळा व शिशु विकास मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
येथील श्री.फत्तेसिंह शिक्षण संस्था संचलित श्री तारामाता प्राथमिक शाळा व शिशु विकास मंदिरचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो व सर्वांगीण विकासासाठी, बौद्धिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांचा शारीरिक व भावनिक विकास खूप होणे खूप महत्त्वाचे आहे,असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांनी केले.
तर विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शाळेबरोबरच समाज आणि पालक यांचे योगदान खूप मोलाचे असते,असे प्रतिपादन संस्थेचे विश्वस्त बाळासाहेब मोरे यांनी आपल्या मनोगतनातून व्यक्त केले. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष प्रल्हाद जाधव,विश्वस्त सुधाकर गोंडाळ,अमर शिंदे , मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जाधव -फुटाणे,मोहन चव्हाण ,ताराबाई हांडे ,सरिता सूर्यवंशी आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले .नंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा कदम यांनी अहवाल वाचन केले व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, बालगीते, कोळीनृत्य, ऐतिहासिक गीते , शेतकरी नृत्य, हिंदी मराठी चित्रपटातील गीते, सादर केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिशु विभागाच्या मुख्याध्यापिका संयोगिता साळुंखे ,सहशिक्षिका रागिणी जाधव , पुष्पा हरवाळकर , अंजली जाधव ,प्रशांत सांगोळगी ,आरिफ शेख, वैशाली फुटाणे ,राणी गरड,उमा गोंडाळ,अमोल पाटील ,शितल जाधव ,लता शिर्के,सुवर्णा सुरवसे , शुक्राचार्य चव्हाण यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन शितल कदम यांनी केले तर आभार शितल गोडसे यांनी मानले.