ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अस्सल सोलापुरी जेवणाचा आस्वाद घेत गावाकडच्या आठवणीत रमले अधिकारी !

अक्कलकोट निवासी मुंबईकरांचा स्नेह मेळावा उत्साहात

अक्क्लकोट : तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात स्वतः च्या हिमतीवर प्रामाणिकपणे काम करत विविध उद्योग व्यवसाय करत असताना आपले गाव आणि आपल्या अक्कलकोट तालुक्याचा ओढ असणाऱ्या विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा स्नेह मेळावा पार पडला.

मुंबईतील अक्कलकोट तालुक्यातील आपली माणसे एकत्र यावे यासाठी मैंदर्गी गावचे सुपुत्र उच्च न्यायालयातील वकिल विश्वनाथ पाटील यांनी मुंबईतील अक्कलकोटकरांना व्हाटस अप ग्रुप माध्यमातून एकत्र आणले. त्यानंतर सर्वांना घेऊन कार्यक्रम घेण्याचे ठरले. नियोजन करण्यासाठी विविध मंडळींनी आपल्यापरीने योगदान देत कार्यक्रम नियोजन केले.याआधी देखील दोन स्नेह मेळावे घेण्यात आले.पहिला स्नेह मेळावा उड हाऊस जिमखाना साऊथ मुंबई व दुसरे स्नेह मेळावा हॉटेल वैशाली चेंबूर येथे पडला होता.यंदाचा स्नेह मेळावा हा तिसरा आहे.

पनवेल जवळच्या नरेश बिराजदार यांच्या निसर्ग रम्य परिसरात असलेल्या फार्म हाऊसमध्ये हुरडा पार्टी व अस्सल सोलापूरी जेवणाचा बेत आखला गेला.शेतकरी ते ग्राहक थेट असा अस्सल सोलापुरी हुरडा , शेंगा चटणी, स्पेशल फरसाण, मका चिवडा, बारीक शेव,भरली मसाला वांगी, सेंद्रिय फळे,सेंद्रिय गुळ, थंडगार मठ्ठा,बेसन पिटला,पालक गरगट्टा, मिक्स भाजी, ज्वारी भाकरी, बाजरी भाकरी,हिरवी मिर्ची ठेसा, दही चटणी, शेंगा पोळी, धपाटे,दाळ,जिरा भात असा भरगच्च ग्रामीण जेवणाचा बेत या माध्यमातून ठेवण्यात आला होता.प्रारंभी आलेल्या मान्यवरांनी छोटेखानी आपला परिचय दिला व सोबत गरमागरम हुरडा ताव मारत अनेकांनी कविता, मराठी, हिन्दी गाणी सादर केले.याच दरम्यान अनेक मान्यवरांनी आपल्या व्यवसाय उभा करताना आलेले अनुभव सांगितले.यात सगळ्यचा सूर कल हाच होता की मुंबईत प्रामाणिक व कष्टाने काम केले तर मुंबई कुणाला ही निराश करते नाही.जेवण करत असताना गप्पागोष्टी करत विविध गावरान पदार्थांचा आस्वाद घेतला.यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षचे प्रमुख मंगेश चिवटे,संजय पाटील ,नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,डॉ.रमेश भुमे , परिवहनचे उपायुक्त परिवहन विद्यासागर हिरमुखे,मल्लिनाथ जेऊरे,गणेश शेटे, बाबासाहेब राजळे,धनराज पांडे, अड. एस. एम. पाटील,गजानन बेल्लाळे , राजेंद्र बिडवे आदिंसह सरकारी कॉंट्रॅक्टकर व इतर मान्यवरांनी या स्नेह मेळाव्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

या स्नेह मेळाव्याला मुंबई परिसरातील कर्जत, खोपोली, पालघर पासून ते दक्षिण मुंबई पर्यन्तच्या परिसरात वास्तव्यास असलेले ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.विशेष म्हणजे या स्नेह मेळाव्यास पुण्याहून अनेक अक्कलकोटकर मित्रमंडळी आवर्जून उपस्थित होते. चंद्रशेखर नंदीकोल स्वामी यांनी पूजा करून केली. स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी मुंबई निवासी अक्कलकोटकर या ग्रुपचे अँड अर्जुन पाटील (सर्वोच्च न्यायालय), आनंद गवी (रियल इस्टेट), नरेश बिराजदार (बिल्डर), सिद्धेश्वर जम्मा, (उद्योगपती), काशीनाथ सगुळमळे (उद्योगपती), सुनील पाटील (सचिव, अवजड वाहतूक सेना), सुमित फुलारी (छत्रपती प्रतिष्ठान) व इतर ग्रुप सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!