कोल्हापूर : वृत्तसंस्था
“एका पक्ष प्रमुखाला हा सत्तेचा मोह आज नाही २०१४ पासून होता. मी पदाला हापापलो नव्हतो, मला सांगितलं असतं तर मी तसं वातावरण केलं असतं. उद्धव ठाकरे दिसतात तसे नाही, त्याच्या मागे अनेक चेहरे आहेत. सत्तेच्या एका खुर्चीपाई यांनी बेईमानी केली.
तुमच्या परिवारावर काही घडल़ तेव्हा तुम्ही अशोक चव्हाण व अजित पवारांसोबत गेलात. आजचं अधिवेशन बघा शेवटची खुर्ची भरलेली आहे, वारसा सांगणाऱ्यांनी कधी तरी आरसा पाहावा,” अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली.
शिवसेना शिंदे गटाचे महाअधिवेशन सध्या कोल्हापूरमध्ये सुरू आहे. आज या महाअधिवेशनाचा दुसरा दिवस. आज महाअधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेते तसेच कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
“कोल्हापूर आणि बाळासाहेबांचं एक अतूट नातं आहे. त्यामुळेच त्याच्या आशीर्वादाने आपण पून्हा शिवसेना नव्याने उभी करतोय. आपला पक्ष मोठा होतोय हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आपला धनुष्यबाण नाव हे आपल्याकडे आहे ही जमेची बाजू आहे. बाळासाहेब यांचे विचार पुढे नेहतोय त्यामुळेच आपला विजय निश्चित आहे. आपल्या गर्दीमुळे शिवसेना कुणाची हे सांगायची आवश्यक्यता नाही,” असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. “आज राम मंदीरावेळी बाळासाहेब असते तर मोदी शहांचे त्यांनी कौतुक केलं असतं. आमचे अनेक आमदार शिवसेनेत आले येत आहेत. हजारो सैनिक का येत आहेत. जोपर्यंत सोबत आहेत तोपर्यंत चांगला, गेला की गद्दार व कचरा. एक दिवस हम दो हमारे दो ची वेळ येईल, आत्मपरीक्षण आत्मचिंतन कुणी केलं पाहिजे, हे त्यांना समजायला पाहिजे..” असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
“हिंदुत्व सोडलं नाही म्हणता मग साहेब सांगत होते तेव्हा काँग्रेसला का ला़ंब ठेवलं नाही? सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत का गेलात? आम्ही सांगत होतो पण ऐकलं नाही. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी धाडस केलं. माझ्यासोबत ५० आमदार आले काही मंत्र्यांनी पायउतार केले. आम्ही बाळासाहेबांचे विचारापासून दूर जात असल्याने आम्ही सत्तेतून पाय उतार झालो,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.