ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा : ऊसाला देणार ३ हजार रुपयांचा दर

प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांची माहिती

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी जयहिंद शुगरकडुन १६ फेब्रुवारीपासुन येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३ हजार रुपये दर देणार असल्याचे प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांनी सांगितले.मागील वर्षी खुपच कमी पर्जन्यमान झाल्यामुळे सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यातच दिवसेंदिवस तापमानात वाढ होत चालली आहे.भुजलपातळी कमी होत चालल्याने मार्चपर्यंत ऊसाचे संगोपन करण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.लागवडीचा खर्च वाढणार आहे,तर उत्पादनात घट होणार आहे.अशा कठीण परिस्थितीत आर्थिक अडचणीतुन मार्ग काढत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

पुढे बोलताना माने देशमुख म्हणाले की, यापुढे दुष्काळी परिस्थितीचा विचार करता १६ मार्चपासून येणाऱ्या ऊसाला ३ हजार १०० रुपये प्रतिटन देण्यात येणार आहे.यापुर्वी हंगामाच्या सुरवातीला जाहीर केल्याप्रमाणे १५ फेब्रुवारीपर्यंत पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना २ हजार ७०० रुपयांचा दर देण्यात येणार आहे.१६ फेब्रुवारीनंतर ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार ७०० प्रमाणे रक्कम जमा करण्यात येईल.तर उर्वरित रक्कमेपैकी अनुक्रमे ३०० रुपये व ४०० रुपयांचा टप्पा आगामी दसरा,दिवाळीच्या सणासाठी जमा करण्यात येणार असल्याचे बब्रुवान माने देशमुख यांनी सांगितले.आजपर्यंत जयहिंद शुगरकडुन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत.यापुढील काळात जास्तीत जास्त ऊस जयहिंद शुगरला देऊन सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन विक्रमसिंह पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आर.पी.देशमुख आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!