ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘पुणे पदवीधर’ निवडणुकीत भाजपला खिंडार ; महाविकास आघाडीची बाजी

पुणे  : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे.  पुणे पदवीधर मतदारसंघावर महाविकास आघाडीने झेंडा फडकवला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे.

या निवडणुकीत अरुण लाड यांना तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली आहेत, तर भाजप उमेदवार संग्रामसिंह देशमुख  यांना 73 हजार 321 मते मिळाली आहेत. लाड यांनी या निवडणुकीत 48 हजार 824 मतांची आघाडी मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. लाड यांनी 1 लाख 14 हजार 137 मतांचा कोटा पूर्ण करून विजय मिळवला आहे.

 

अरुण लाड व संग्राम देशमुख यांच्याशिवाय जनता दल सेक्युलरचे माजी आमदार शरद पाटील व मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे या देखील रिंगणात होत्या. मात्र, खरी लढत लाड आणि देशमुख यांच्यात असल्याचं सुरुवातीलाच स्पष्ट झालं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!