ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बजेट कोलमडणार : १ मार्चपासून बदलणार हे नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशात गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता नवा महिना सुरु झाला की नवे नियमही लागू होता. आता 1 मार्चपासून तुमच्या बजेटशी संबंधीत काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा परिणाम सामान्यांच्या खिशावरही होणार आहे.
1 मार्चपासून फास्टॅग , एलपीजी गॅस सिलेंडरच्या नियमात बदल होतील. तर सोशल मीडियाच्या सुरक्षेसाठीही मोठा निर्णय घेण्यात आाला आहे. एक मार्चपासून हे नियम लागू होतील.

LPG सिलेंडरची किंमत
1 मार्चपासून एलपीची गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल होऊ शकतो. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत जारी करतात. 1 मार्चलाही तेल कंपन्या गॅस सिलेंडरच्या नव्या किंमती जारी करतील. फेब्रुवारी महिना याला अपवाद ठरला होता. फेब्रुवारीत गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. आता 1 तारखेला किंमतीत काय बदल होणार याकडे सामान्यांचं लक्ष लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार तेल कंपन्यां सामान्यांना दिलासा देऊ शकतात. गॅस सिलेंडरच्या किंमतीत थोडीफार घट होऊ शकते. सध्य एलपीची गॅस सिलेंडरचा दर 14.2 किलोच्या घरगुती वापरातील सिलेंडरसाठी 1053 रुपये इतका आहे. मुंबईत हा दर 1052.50 रुपये तर चेन्नईत 1068.50 रुपये आहे.

1 मार्चपासून Fastag चा नियम बदलणार
तुमच्या कारवर फास्टॅग (Fastag) आहे तर तुमच्याकडे शेवटची संधी आहे. तुम्ही केव्हायसी केलं नसेल तर आजच करुन घ्या. नॅशनल हायवे अॅथॉरिटीज ऑफ इंडियाने (NHAI) फास्टॅगसाठी केव्हायसी करणं अनिवार्य केलं आहे. यासाठी 29 फेब्रुवारीही शेवटची तारीख देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीपर्यंत केव्हायसी अपडेट न केल्यास, तुमचं फास्टॅग ब्लॅकलिस्ट किंवा रद्द केलं जाऊ शकतं. असं झालं तर डबल टोल भरावा लागू शकतो.

14 दिवस बँका बंद
मार्च महिन्यात बँकांना मोठ्या सुट्या आहेत. मार्च महिन्यात तब्बल 14 दिवस बँका बंद राहाणार आहेत. यात शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचाही समावेश आहे.

सोशल मीडियाचे नवे नियम
सरकारने आयटी नियमातही काही महत्वाचे बदल केले आहेत. नवे नियम 1 मार्चपासून लागू होतील. नव्या नियमांनुसार एक्स, फेसबूक, यूट्यूब आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया साईटवर चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या पोस्ट टाकल्यास आर्थिक दंड आकारला जाणार आहे. सोशल मीडियाच्या सुरक्षेसाठी हा नियम बनवण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!