नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. शुक्रवारी मध्यरात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये मारामारी झाल्याची माहिती आहे.
निवडणूक समिती सदस्य निवडीवरून दोन्ही गटात हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या राड्यात काही विद्यार्थी जखमी देखील झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सध्या दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अभाविप आणि डाव्या विचारसरणीच्या गटामध्ये ही हाणामारी झाली. स्कूल ऑफ लँग्वेजेसमध्ये निवडणूक समिती सदस्य निवडीवरून गदारोळ झाला.