---Advertisement---

सराईत गुन्हेगारांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त

By team
On: March 1, 2024 9:41 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

मित्रास भेटून रात्री घराकडे चाललेल्या इसमास अडवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून मोटरसायकलवरून पोबारा करणाऱ्या सराईत चोरटयास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. २३ फेब्रुवारी रोजी फिर्यादी रमेश नंदीमठ हे आपल्या मित्रांना उमानगरी येथून भेटून माणिक चौकमार्गे राहत्या घराकडे निघाले होते. त्यावेळी काळी मशीद येथील मुतारीजवळ चोरटयाने त्यांच्या गळयातील सोन्याची चेन हिसकावून नेली होती.

ही चोरलेली चेन विकण्यासाठी तो मार्केट यार्डात येणार असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच सापळा रुचून त्याला अटक केली. त्याने आपले नाव विनोद विठ्ठल भोसले (रा. संग्गम नगर, जुने विडी घरकुल, सोलापूर) असे सांगितले. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून सोन्याची चेन व चोरीची शाईन मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी पो. नि.दादासो मोरे, सफी किर्दक, संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, अंकुश भोसले, शैलेश बुगड, अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड, मच्छिद्र राठोड, महेंद्र ठोकळ यांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!