ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मंत्री गडकरी यांनी काढले सरकारचे वाभाडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशभरातील शेतकरी, मजूर, गरीब आज दुःखी आहे. कारण जल, जमीन, जंगल आणि जनावर, ग्रामीण, शेती, आदिवासी भाग या ठिकाणी चांगले रस्ते नाहीत. पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही. चांगली रुग्णालये नाहीत. चांगल्या शाळा नाहीत. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगले दर मिळत नाहीत, असे म्हणत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विकासाच्या दाव्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा वाभाडे काढलेत.

नितीन गडकरी यांनी ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत दिल्लीच्या वेशीवर सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनावर आपली रोखठोक भूमिका व्यक्त केली. काँग्रेसने त्यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. नितीन गडकरी शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना म्हणाले की, तांदूळ मका, साखर, गव्हाचे अतिरिक्त उत्पादन हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

हरियाणात तर गहू व तांदूळ ठेवण्यासाठी रेल्वेचे प्लॅटफॉर्म वापरावे लागत आहेत. आपल्याकडे साठवणुकीची पुरेशी व्यवस्था नाही. शेती उत्पादनांचा भाव मागणी व पुरवठ्यानुसार ठरतो. पण आपल्याकडे धान्याच्या किमतींमध्ये फारसे बदल होत नाहीत. त्यामुळे शेती आर्थिकदृष्ट्या परवडेनाशी झाली. या देशाचा शेतकरी फक्त अन्नदाता नसून ऊर्जा उत्पादकही व्हावा असे माझे मत आहे, नितीन गडकरी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!