---Advertisement---

द पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी पुरस्कार प्रित्यर्थ मारुती बावडेंचा वटवृक्ष मंदिरात सत्कार

By team
On: March 5, 2024 12:57 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यातील सोलापूर आकाशवाणीचे वृत्त निवेदक तथा दैनिक संचारचे तालुका प्रतिनिधी मारुती बावडे यांना आशिया खंडातील विविध देशातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामीण पत्रकारितेतील द पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. मुंबईतील आयटीसी मराठा या सप्त तारांकित हॉटेलमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

त्यांना लाभलेल्या या पुरस्कारा प्रित्यर्थ आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी मारुती बावडे यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, देऊन यथोचित सत्कार सत्कार केला. याप्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी मारुती बावडे हे गेल्या २३ वर्षापासून पत्रकारितेत कार्यरत असून त्यांनी विविध लेख मालिका आणि बातम्यांच्या माध्यमातून जलंत समस्यांना वाचा फोडून उत्कृष्ट पत्रकारिता केली आहे. त्यामुळे त्यांना हा सन्मान देण्यात आला असल्याचे मनोगत व्यक्त केले. या सत्कार प्रित्यर्थ बोलताना पत्रकार मारुती बावडे यांनी ग्रामीण पत्रकारितेला या पुरस्कारातून मोठे बळ मिळाले आहे.या पुढच्या काळातही सकारात्मक पत्रकारितेतून सामाजिक बदल घडविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे, गिरीश पवार, विपुल जाधव,जेष्ठ पत्रकार स्वामीराव गायकवाड, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, संजय पवार, प्रसाद सोनार आदिसह देवस्थानचे सेवेकरी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!