ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोन्याचे भाव ६५ हजारांवर ; लग्नसराईचा काळात ग्राहकांना फटका

जळगाव : वृत्तसंस्था

गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच सोन्यातील भाववाढ सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहत बुधवार, ६ मार्च रोजी सोन्याचे भाव ६४ हजार ९०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. अमेरिकेतील बँकांची स्थिती व भारतात आगामी लग्नसराईचा काळ जवळ येत असल्याने भाववाढ अशीच सुरू राहण्याचा अंदाज आहे.

अमेरिकेतील बँकिंग क्षेत्र अस्थिर झाल्याने मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या भावात वाढ सुरू झाली. त्यात मंगळवार, ५ मार्च रोजी सोन्यात ८५० रुपयांनी वाढ होऊन ते ६४ हजार ६५० रुपये प्रतितोळा अशा उच्चांकीवर पोहोचले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीदेखील बुधवार, ६ मार्च रोजी सोन्यात पुन्हा २५० रुपयांची वाढ झाली व सोने ६४ हजार ९०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. ६५ हजारांच्या उंबरठ्यावर सोने पोहोचल्याने अजून हे भाव कितीपर्यंत पोहोचतात, याची सुवर्ण बाजारात उत्सुकता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!