ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आघाडी टिकवण्यासाठी हट्ट सोडायला हवा – राऊत

मुंबई : वृत्तसंस्था

आघाडी धर्म टिकवण्यासाठी प्रत्येकाने सगळे काही आपल्याच मनाप्रमाणे व्हावे, हा हट्ट सोडला पाहिजे, असे शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांचा रोख वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडे असल्याचे बोलले जाते. युतीत किंवा आघाडीत सर्वांच्या मनाप्रमाणे निर्णय होत नाहीत. आम्ही यापूर्वी शिवसेना-भाजप युतीत होतो. तेव्हाही आमच्या मनाप्रमाणे होत नव्हते, असे राऊत म्हणाले.

गुरुवारी पत्रकार परिषदेत राऊत यांनी आघाडीतील घटक इ पक्षांना हा सल्ला दिला. ते = म्हणाले, काँग्रेसने आपला अनेक जागांवरचा हट्ट सोडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि – शिवसेनेनेही बऱ्याच जागांवरचा हट्ट सोडला आहे. शिवसेनेने आपल्या अनेक महत्त्वाच्या जागा आघाडीसाठी सोडल्या आहेत. महाराष्ट्रात आम्हाला वेगळे चित्र निर्माण करायचे आहे. महाविकास आघाडीत ही आमची प्रकाश आंबेडकर यांच्याशी अत्यंत उत्तम चर्चा झाली. आता काही जागांच्या संदर्भात पुढे चर्चा होईल. त्यामुळे काहीच घडले नाही असे सांगणे बरोबर नाही, असे ते वंचितला उद्देशून म्हणाले, वंचितने पुन्हा एकदा आमच्यासमोर प्रस्ताव ठेवला आहे.

आम्ही त्यावर चर्चा करून काही निर्णय घेतले आहेत. या गोष्टी वंचितच्या कार्यकारिणीसमोर मांडल्या जातील. त्यांचा पक्ष लोकशाही मानणारा आहे. त्यानंतर त्यांच्या पक्षाकडून प्रस्ताव येईल. आणि आम्ही त्यावर परत चर्चा करू, असे राऊत यांनी सांगितले. तसेच आम्ही प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे पूर्ण समाधान करायचे ठरवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!