---Advertisement---

अभिनेत्री डॉली सोहीचं निधन ; झुंज ठरली अपयशी

By team
On: March 8, 2024 10:55 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध अभिनेत्री डॉली सोही(वय ४८) वर उपचार सुरु होते. अखेर अभिनेत्री डॉली सोहीचं निधन झालं आहे. डॉली सोहीला कॅन्सरचे निदान झाले होते. पण डॉलीची कॅन्सरसोबतची झुंज अपयशी ठरली. आज सकाळी तिने या जगाचा निरोप घेतल्या.

डॉली सोहीच्या कुटुंबाला एकाच वेळी एक नाही तर दोन धक्के बसले. काल रात्री डॉलीची छोटी बहीण अमनदीपचे निधन झाले. अमनदीपला काविळ झाली होती उपचारादरम्यान तिचे निधन झाले. बहिणीच्या निधनाच्या अवघ्या काही तासांमध्येच डॉली सोहीने देखील प्राण सोडले. सध्या डॉली सोहीच्या कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. डॉलीच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला. डॉलीचे चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!