नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढत असतांना आता सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने इंधनाच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी २ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलचे दर कमी होताच तेल कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत.
तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार मुंबईत आज सकाळी ६ वाजेपासून पेट्रोलचा नवीन भाव १०४.१५ रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा भाव ९२.१० रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ९४.९२ रुपये आणि ८७.६२ रुपये प्रति लिटर इतके आहे.
याआधी राज्य सरकारने जुलै २०२२ मध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेलचे दर ३ रुपये प्रति लिटरने कमी करण्यात आले होते. दरम्यान, आता पुन्हा इंधनाच्या दरात कपात करण्यात आल्याने कोणत्या शहरात, किती रुपयांना पेट्रोल-डिझेल मिळणार हे जाणून घेऊयात…
मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर १०४.१५ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर हे ९२.१० रुपये प्रति लिटर आहेत.
पुण्यामध्ये आज पेट्रोलच्या किंमती १०३.८४ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९०.७१ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.
नाशिकमध्ये आज पेट्रोलची १०४.१८ रुपये प्रति लिटरने विक्री होतेय. तर डिझेल ९०.४१ रुपये प्रति लिटर इतकं आहे.
नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०४.०४ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.६३ रुपये प्रति लिटर एवढी आहे.
छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०५.२१ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९१.५७ रुपये प्रति लिटरने मिळतंय.
अहमदनगरात पेट्रोलच्या किंमती या १०३.९६ रुपये प्रति लिटर अशा आहेत. डिझेलच्या किंमती ९१.४१ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.