ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट शहराच्या पाण्याची वणवण लवकरच सुटणार…!

अमृत पाणीपुरवठा अंतर्गत ७५ कोटी निधी मंजूर ; आ.कल्याणशेट्टी यांचा पाठपुरावा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट शहराला भेडसावणारी पाण्याची समस्या आणि वाढती मागणी लक्षात घेऊन शहराला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आ.सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून, शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 75 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.

तसेच अक्कलकोट येथील सभेतील मागणीला देखील मंजुरी देत राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला आहे. आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी मा. देवेंद्रजींचे मनःपूर्वक आभार मानले आहे.

नवीन पाणीपुरवठा योजना वैशिष्ट्ये —
व्यवस्थापनासाठी एक पर्यवेक्षी नियंत्रण आणि डेटा संपादन एससीएडीए प्रणाली सुरू
• 6 एमएलडी क्षमतेचा नवीन ट्रीटमेंट प्लांट निर्माण होणार
• गळतीच्या समस्यांमुळे त्रस्त असलेल्या भागात सेवा देण्यासाठी वितरण लाइन टाकली जाणार
• स्वयंचलित रीडिंग मीटरसह 11,557 घरांची जोडणी देण्यात येणार आहे.
•व्यवस्थापनासाठी एक पर्यवेक्षी नियंत्रण आणि डेटा संपादन एससीएडीए प्रणाली सुरू केली जाणार
•अक्कलकोटकर व स्वामीभक्तांना रोज सुरळीत पाणीपुरवठा होणार
•पुढील तीन दशकांसाठी शाश्वत, कार्यक्षम आणि विश्वासार्ह पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मदत

अभिमानाची बाब म्हणजे या पंधरवड्यात देगाव एक्सप्रेस कॅनॉल 400 कोटी रुपये , अक्कलकोट ते जेऊर मार्गे बरूर रस्ता 270 कोटी रुपये, आणि आता अक्कलकोट शहर पाणीपुरवठा 75 कोटी रुपये असे एकूण 745 कोटी रुपयांचा विक्रमी निधी मंजूर झाल्याने, मतदार संघातील तीनही महत्वाची प्रलंबित कामे मार्गी लागतील. तसेच यामुळे मतदारसंघाचा पायाभूत विकास देखील होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!