ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महिला दिनानिमित्त टोटल धमाल एन्टरटेन्मेंट विथ न्यू गेम्स उत्साहात

हिकरणी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम

अक्कलकोट : प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व सहयोगी संस्था असलेल्या हिकरणी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त टोटल धमाल एन्टरटेन्मेंट विथ न्यू गेम्स या अनेक कलांचा संगम असलेला अनोखा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

दरम्यान मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ, तुळजाभवानी व गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. महिलांच्या कला गुणांना वाव व एक अनोखा मैत्रेईचे घट्ट नाते निर्माण व्हावे यासाठी मनोरंजनात्मक, बौध्दिक खेळ, गाणी गप्पा गोष्टी, गमत आणि गेम्स, प्रश्नमंजुषा असे विविध खेळ संपन्न झाले.

या विविध मनोरंजनात्मक खेळात विजेत्या गटाततील अनुराधा पाटील, धनश्री हिप्परगी, भाग्यश्री मचाले, ज्योती पाटील, अश्विनी मायनाळे, महादेवी उंबरजे, मेधा कोरे, उदया अचलेरकर, लक्ष्मी सुतार, निशा बाबर, अनिता गडदे, भुवनेश्वरी विभुते, वैभवी भालके, सुवर्णा इंगळे, वाकडे ज्योती शिवशिंपी व भारूडकर्ते – शिंदे काकू यांचा उपस्थित माण्यावाराच्या हस्ते विजेत्या महिला गटांचा सन्मान करण्यात आला.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.आसावरी पेडगावकर, डॉ.पवित्रा मलगोंडा, डॉ.सायली बंदिचोडे, कोमल क्षीरसागर, स्नेहा माळशेट्टी, मनीषा माळशेट्टी, सुजाता भीमपुरे, सोनल जाजू, मीनल शहा, स्वप्ना शहा, आशा भगरे, वर्षा हिप्परगी, संध्या हिप्परगी, अश्विनी शिंपी, सरदेशमुख, सोनटक्के, अशा कदम, अनिता गडदे, अक्षता सोनावणे, तुप्ती बाबर, माधवी धरमसाले, श्वेता जिडगे व कार्यक्रमाचे संयोजक व निमंत्रक बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा अलकाताई भोसले, सचिवा अर्पिताराजे भोसले, उपाध्यक्षा रत्नमाला मचाले उपस्थित होते.
या कार्यक्रमास हिकरणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या स्मिता कदम, संगीता भोसले, उज्वला भोसले, अंजना पवार, पल्लवी कदम, कविता वाकडे, सुवर्णा घाटगे, रूपा पवार, स्वाती निकम, पल्लवी नवले, क्रांती वाकडे, सपना माने, राजश्री माने, धनश्री पाटील, छाया पवार यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.सदरचा कायँक्रम अननछत्र मंडळाच्या परिसरात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!