ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कै.कल्याणराव इंगळेंच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

दिनांक १८ मार्च रोजी कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात कार्यक्रमांचे आयोजन

अक्कलकोट : प्रतिनिधी

येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे माजी चेअरमन कै.कल्याणराव इंगळे यांच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, रोजगार मेळावा, विशेष सत्कार समारंभ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली.

सदरहू कार्यक्रम दिनांक १८ मार्च रोजी देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात संपन्न होतील. दिनांक १८ मार्च रोजी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, रोजगार मेळावा इत्यादी कार्यक्रमांचे शुभारंभ सकाळी १० वाजता येथील विरक्त मठाचे मठाधिपती म.नि.प्र. बसवलिंग महास्वामीजी, प.पू.चोळप्पा महाराजांचे वंशज प.पू.अण्णू महाराज, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईचे आंतरराष्ट्रीय संबंध व परराष्ट्र धोरण अभ्यासक तसेच महाराष्ट्र उच्च शिक्षण विभागाचे संचालक मा.डॉ.शैलेंद्र देवळाणकर व अमरावती येथील पूज्य ज्योतिषाचार्य ह.भ.प.सागर महाराज देशमुख (वकील) आळंदीकर यांच्या शुभहस्ते संपन्न होईल. कै.कल्याणराव इंगळे यांच्या या पुण्यस्मरणानिमित्त अमरावती येथील पूज्य ज्योतिषाचार्य ह.भ.प.सागर महाराज देशमुख (वकील) आळंदीकर यांच्या शुभहस्ते डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांचा विशेष सत्कार समारंभ संपन्न होईल.

कै.कल्याणराव इंगळेंच्या या पुण्यस्मरणानिमित्त छोट्या पडद्यावरील मराठी मालिकेचे अभिनेते अथर्व कर्वे यांचा विशेष कार्यक्रम तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शाहीर मा.डॉ.शाहीर आझाद नाईकवाडी हे कै.कल्याणराव इंगळे यांच्या जीवन कार्यावर पोवाडा सादर करतील, तरी गरजूंनी रोजगार मेळावा, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, आदी कार्यक्रमांसह या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अन्य कार्यक्रमांचा व भोजन प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे व कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!