ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लोकसभेची बिगुल वाजले : २० मे राज्यात मतदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील लोकसभा निवडणुकीच आजपासून बिगुल वाजले असून लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज दि.१६ रोजी लोकसभेचे वेळापत्रक जाहीर केले. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सात टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात टप्प्यात मतदान होणार असून महाराष्ट्रात २० मे ला लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करण्यात येणार आहे.

लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 26 एप्रिलला पहिला तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा असेल. 26 एप्रिलपासून, 7 मे, १३ मे, २० मे, २५ मे रोजी मतदान असेल तर ४ जूनला मतमोजणी होईल, अशी माहिती केंद्रीय निवडणुक आयुक्तांनी दिली आहे. तसेच तसेच 26 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

आम्ही प्रत्येक जिल्ह्यात सर्व निवडणूक पक्षांसोबत चर्चा केली आहे. आम्ही महिला मतदारांवर जास्त भर दिला आहे. महिलांचा मतदानाचा वाटा वाढला आहे. महिला मतदारांची संख्या 12 राज्यात पुरुषांपेक्षा जास्त आहे. प्रत्येक मतदार केंद्रावर पाणी, शौचालय, व्हील चेअर या सगळ्याची व्यवस्था केली आहे, अशी माहितीही निवडणूक आयोग आयुक्तांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!