ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिमप्रकाश मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या शिबिरात ६४ जणांनी केले रक्तदान

 

अक्कलकोट, दि. ६ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘भिमप्रकाश मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थे’तर्फे लोकापुरे मल्टीपर्पज हॉल अक्कलकोट येथे शनिवार ०५ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी ६४ रक्तदात्यांनी रक्तदान करून अभिवादन केले
या रक्तदान शिबीराचे उदघाटन उत्तर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक के . एस . पुजारी ,भिमप्रकाश सामाजिक संस्थे संस्थापक अध्यक्ष- शिलामणी बनसोडे,जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर बहुउदेशीय संस्था संस्थापक अध्यक्ष जोतिर्लिंग स्वामी , शिव – बसव डॉ . बी . आर .आंबेडकर मागासवर्गीय बहुउदेशिय संस्था संस्थापक अध्यक्ष संदीप मडिखांबे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे , युवानेते प्रकाश गायकवाड, संत कक्कय्या महाराज युथ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष उत्तम इंगळे, पत्रकार राजेशकुमार जगताप , पत्रकार स्वामीराव गायकवाड , पत्रकार रमेश भंडारी प्रहारचे नितीन माने आदीच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी संस्थेचे सचिव रमेश बनसोडे ,खजिनदार विजय भालेराव, उपाध्यक्ष शिवानंद मडिखांबे,सिद्धार्थ साळे, प्रदिप मडिखांबे , दिपक मडिखांबे , अविनाश गायकवाड, रविंद्र बनसोडे , गौतम बाळशंकर , रवि पाटील , निलेश कोळळे , चिदानंद गाडेकर, परशुराम भगळे , स्वप्नील बऱ्हणपूरकर , सचिन मोरे , नागेश कोळी , प्रदिप सर्जन , गौतम घाटगे , सायबण्णा गायकवाड, जय बनसोडे , दशरथ मडिखांबे , राम सोनकांबळे , रोहित सोनकांबळे , किरण शिवशरण , अमित शिंदे , मुत्तु अरुणे , शिवा नाटीकर , भागवत मडिखांबे , राहुल भगळे,प्रशांत मडिखांबे,बंटी नडगम,दशरथ खंदारे उत्तम बनसोडे,दौलप्पा माने, आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते . या शिबीरामध्ये एकूण ६४ रक्तदात्याने रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्यानां संस्थेच्या वतीने घडयाळ देण्यात आले .

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!