---Advertisement---

भरदुपारी शिर्डीत गोळीबार ; परिसरात खळबळ

By team
On: March 21, 2024 4:46 PM
Follow Us:
---Advertisement---

अहमदनगर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच आज गुरुवारी शिर्डी शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडली. भर दुपारच्या सुमारास गोळीबार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनूसार संशयिताने दोन गोळ्या झाडल्या. शिर्डी पाेलिस घटनास्थळी पाेहचले असून घटनेचा तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी शहरातील एका खासगी पार्किंगमध्ये आज दुपारच्या सुमारास गाेळीबाराची घटना घडली. संशयिताने झाडलेल्या दोन गोळ्यांपैकी एक गाेळी हॉटेलच्या खाेलीत घुसली. या घटनेनंतर संशयितांना घटनास्थळावरुन धूम ठाेकली. या घटनेनंतर संबंधित हाॅटेल परिसरात आणि शिर्डी शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती समजताच शिर्डी पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनूसार या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. या घटनेचा तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!