ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजप लोकांना वेड्यात काढते ; सोलापुरात आ.शिंदेंचा हल्लाबोल

सोलापूर : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आता पहिली दुसरी यादी जाहीर केली आहे तर सत्ताधारी व विरोधकामध्ये आज देखील आरोप प्रत्यारोप सुरु आहे. सोलापुरात देखील कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

भाजपचे मागील दोन्ही खासदार अकार्यक्षम ठरले म्हणून त्यांना त्यामुळे प्रत्येकवेळी त्यांना उमेदवार बदलावा लागला आणि आता तर त्यांना कोणी सापडतच नाहीये, असा टोला काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी लगावला आहे. दरम्यान काँग्रेसच्या आमदार प्रणाती शिंदे म्हणाल्या की, माझ्याकडे सोसायटी, बँक आणि कारखाना नसल्यानी ईडीबिडीची भिती नाहीये, त्यामुळे मी भाजप विरोधात बोलणारच, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. सोलापूर जिल्ह्यातील होटगीमध्ये बोलत असताना त्यांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे.

सोलापूर काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे म्हणाल्या की,यंदाची निवडणूक ही ‘करेंगे या मरेंगे’ अशी आहे. लोकशाही आणि संविधान संपावण्याचा डाव भाजप मोदी करत आहेत. कालच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. त्यासोबतच काँग्रेस पक्षाची सर्व खाती गोठवण्यात आली. एक महिन्यापूर्वी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. काँग्रेसचे डी.के.शिवकुमार यांना ही अटक करण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाला संसदेत बोलू देत नाहीत. त्यांचे माईक बंद करतात. ही लोकशाही आहे की हुकूमशाही?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, पेट्रोल पंपावर गेले की मोदींचे मोठंमोठे पोस्टर्स दिसतात, व्हाट्सअपवर त्यांचे पोस्टर्स, टीव्ही – रेडिओ लावला की त्यांची जाहिरात. तुम्हाला एवढे खोटे बोलून वेड्यात काढत आहेत. निवडणूकीच्या तोंडावर 2 रुपयांनी पेट्रोलचे भाव कमी करून भाजप लोकांना वेड्यात काढत आहे. तरी पण आपण जर भाजपला मतदान केले तर आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!