मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना जरांगे पाटील पुन्हा एकदा भाष्य केल्याने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहे. बुधवारी पुन्हा एकदा राज्य सरकारला आपल्याला हलक्यात न घेण्याचा इशारा दिला आहे. राजकारणात मला हलक्यात घेऊ नका हे मी यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते. तूर्त 30 मार्चपर्यंत आमचा कुणालाही पाठिंबा नाही. पण त्यानंतर आम्ही आमची भूमिका घेणार, असे ते म्हणाले.
मला काहीच व्हायचे नाही, आणि होणारही नाही, मी शब्द दिला दिला. 30 तारखेपर्यंत शब्द दिला दिला पण मराठा समाजाचा भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत आमचा ना कुणाला पाठिंबा आहे ना आम्ही कोणता उमेदवार दिला आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, राजकारणात मला हलक्यात घेऊ नका, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते. 30 तारखेनंतर आम्ही जे आतून ठरवले आहे ते धडाधड होणार आहे. दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले होते की, 48 नाही तरी किमान 17-18 मतदरासंघांवर मराठ्यांच वर्चस्व आहे. त्याठिकाणी कुणाचाही कार्यक्रम होऊ शकतो. मराठ्यांनी या मतदारसंघांमध्ये एकगठ्ठा मतदानाचा निर्णय घेतला, तर दुसरे कोणीही निवडून येऊ शकणार नाही. इतर समाजाचे म्हणजे मुस्लिम, दलित बांधवही तुमच्या सोबत येतील, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
लोकसभेला जास्त फॉर्म भरून समाज अडचणीत येऊ शकतो. सगळ्यांनीच फॉर्म भरले तर आपलीच मते विभागली जातील. त्यामुळे नको त्यांचे साधले जाईल, असे सांगत जरांगे पाटील यांनी एका जिल्ह्यातून अपक्ष म्हणून एकाच उमेदवाराचा फॉर्म भरायचा असे त्यांनी सुचवले. फॉर्म कुणाचा भरायचा किंवा काय करायचे हे त्या मतदारसंघातील समाज बांधवांनीच ठरवायचे, असे म्हटल्यानंतर आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंची भेट घेत आपले 8 उमेदवार उभे केले आहे. मनोज जरांगेंशी चर्चेनंतर उमेदवार उभे केल्यानंतर आता राज्यात वेगळे राजकीय समीकरण बघायला मिळणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.