मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीचे भाजपचे जागा वाटप झाले असतांना त्यापाठोपाठ राज्यात ठाकरे गटाने देखील आज पहिली यादी जाहीर केली आहे. तर आता राज्यातील जनतेचे लक्ष शरद पवार गटाकडे असतांना आता राज्यातील महायुतील जागा वाटपावरून मित्रपक्षांमध्ये कलगितुरा पाहायला मिळत आहे. एकीकडे जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकांचा धडाका सुरू असतानाच माढ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकरच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विरोध पाहायला मिळाला होता.
निंबाळकर यांच्या विरोधात एक गट एकवटल्याचं पहायला मिळालं होतं. त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं असून येत्या चार दिवसात मोहिते पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश होण्याचे जयसिंह मोहिते पाटील यांनी संकेत दिले आहे.