ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रेल्वेचा भन्नाट प्लान : उन्हाळ्याची सुट्टीत करा अशी मज्जा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक भागात आता चांगलेच उन तापायला लागले आहे. त्यामुळे अनेक लोक न्हाळ्याची सुट्टी लागली की, बाहेर फिरण्याचे वेध लागतात. शाळा-कॉलेजला सुट्टी लागल्यामुळे अनेकांना फिरण्याची आवडते तर काहींना ट्रेकिंगला. यासाठी आपण ट्रिपचा प्लान करतो.
यंदाच्या एप्रिल महिन्यात तुम्हाला फिरायचे असेल तर IRCTC ने भन्नाट टूर प्लान आणला आहे. यामध्ये तुम्हाला अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देता येईल. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत देवदर्शनाचा प्लान करु शकता. जाणून घेऊया टूर प्लानबद्दल सविस्तर

पॅकेजचे नाव – “मानखंड एक्सप्रेस – भारत गौरव टुरिस्ट ट्रेन”
पॅकेज कालावधी – 10 दिवस आणि 11 रात्री
टूर पॅकेज तारीख – २२ एप्रिल
प्रवास कुठून सुरु होईल? – पुणे – खातिमा – टनकपूर – पुणे
प्रवास मोड – भारत गौरव टुरिस्ट ट्रेन

1. टूर पॅकेजमध्ये कोणत्या सुविधा मिळतील?
या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला राउंड ट्रिप ट्रेनचे तिकीट, बसची सुविधा, हॉटेलमध्ये राहण्याची सोय तसेच गाइड आणि विमा मिळेल.

2. फिरण्याची ठिकाणे
आयआरसीटीसीच्या या टूर प्लानमध्ये तुम्हाला
टनकपूर – पूर्णागिरी, शारदा नदी घाट
चंपावत/लोहाघाट या ठिकाणी संध्याकाळची आरती आणि भजन – बालेश्वर, चहाचे बाग, मायावती आश्रम, हात कालिका मंदिर, पाताल भुवनेश्वर, जागेश्वर धाम
गोलू देवता – चिताई, नंदा देवी,
कैंची धाम – बाबा नीम करोली मंदिर
कासार देवी आणि कातरमल सूर्य मंदिर
नानकमत्ता गुरुद्वारा – खातिमा
नैना देवी- नैनिताल
या तीर्थक्षेत्रांना भेट देता येईल.

3. बुकिंग खर्च किती?
जर तुम्ही स्टॅर्डड कॅटेगरीमधून जास्त असाल तर प्रति व्यक्तीसाठी २८,०२० रुपये भरावे लागतील. जर तुमच्यासोबत लहान मुले असतील तर तुम्हाला प्रति व्यक्तीसाठी २८,०२० रुपये भरावे लागणार आहे.
तुम्ही डिलक्स कॅटेगरीमधून फॅमिली ट्रिपसाठी जात असाल तर प्रति व्यक्तीसाठी ३५,३४० रुपये मोजावे लागतील.

4. बोर्डिंग / डिबोर्डिंग स्टेशन्स
पुणे, एल ओनावला, पनवेल, कल्याण, नाशिक, जळगावएन, भुसावळ, कांडवा, इटारसी आणि राणी कमलापती.

5. कसे कराल बुक?
पॅकेज बुक करण्यासाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. याशिवाय तुम्हाला IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!