सोलापूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्षपदी कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार गुरय्या रे.स्वामी (कलबुरगी ) यांची निवड करण्यात आली आहे. अंमळनेर (जि.जळगाव) येथे ३ फेब्रुवारी २०२४ रोजी महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेतील ठरावानुसार रमेश वंसकर (गोवा) यांचा कार्यकाल ३१मार्च २०२४ रोजी संपल्यानंतर १ एप्रिल २०२४ पासून ३१ मार्च २०२६ पर्यंत म्हणजे दोन वर्षासाठी गुरय्या रे स्वामी यांची आखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
महामंडळाच्या इतिहासात अत्यंत तरुण उपाध्यक्ष म्हणून गुरय्या स्वामी यांची नोंद होईल.गुरय्या रे स्वामी यांच्या निवडीबद्दल संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.रवींद्र शोभणे, मराठवाडा साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ.दादा गोरे (संभाजीनगर), उपाध्यक्ष प्रा.किरण सगर,प्रा.मिलिंद जोशी(पुणे) डॉ. उज्ज्वला मेहेंदळे (मुंबई),डॉ.रामचंद्र काळुंखे,डॉ.गजानन नारे प्रदीप दाते(नागपूर),प्रा.संजय बच्छाव(बडोदा), डॉ.विद्या देवधर(हैद्राबाद),पुरुषोत्तम सप्रे(भोपाळ),कपूर वासनिक(छत्तीसगड) रमेश वंसकर(गोवा) व महामंडळाच्या इतर सदस्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मानसेवी पत्रकार म्हणून गुरय्या रे स्वामी हे ३६वर्षापासून कार्यरत आहेत.नूतन उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल येत्या २१ एप्रिल रोजी मुंबई मराठी साहित्य संघ गिरगाव कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.