ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट राजेराय मठात श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन उत्साहात

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेने स्थापन झालेल्या व परमपूज्य सद्गुरु बेलानाथ बाबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या राजेराय मठात श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन पूजा ,अभिषेक ,पारायण ,महाप्रसाद इत्यादी करून साजरा करण्यात आला. पहाटे ५ वाजता काकड आरती नंतर मठाचे उपाध्यक्ष विकास दोडके यांनी उपस्थित सर्व भक्तगण तसेच शिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप व अँड जयंत वाघ यांच्या हस्ते सामुदायिक पूजा करण्यात आली .सकाळी ९ वाजता ज्योती झिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली “श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत “या पोथीचे पारायण संपन्न झाले.

यात पंच्याहत्तर महिलांनी सहभाग नोंदविला दुपारी १२: १५ वाजता सर्व भक्तगणांच्या उपस्थितीत श्रींच्या चैतन्य पादुकावर गुलाल वाहण्यात आला. त्यानंतर मठाचे अध्यक्ष अँड. शरद फुटाणे जाधव यांच्या उपस्थितीत सर्व भक्तांच्या हस्ते सामुदायिक आरती करण्यात आली. दुपारी १२:३०ते ३:३० दरम्यान उपस्थित भक्तांना दूधपुरणपोळी इत्यादीचा महाप्रसाद देण्यात आला.

याप्रसंगी अक्कलकोट बरोबर मुंबई हैदराबाद, पुणे, सोलापूर ,कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, नांदेड आदी ठिकाणाहून भक्तगण दर्शनास व महाप्रसाद घेण्यासाठी आले होते. आजच्या दिनी अक्कलकोट संस्थांनचे नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले हे आपल्या मातोश्री सोबत दर्शनास आले होते.यावेळी संचारचे पत्रकार मारुती बावडे यांना अक्कलकोट भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मठाच्यावतीने सत्कार करण्यात आला.सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मठाचे सचिव किसन झिपरे, विश्वस्त अँड अनिल मंगरुळे ,दत्तात्रय मोरे , विजयकुमार गाजुल, व्यवस्थापक सुदाम पाटील, विक्रम पाटील, धनंजय गायकवाड, अँड श्रद्धांक झिपरे, पुष्पा जाधव,ओंकार दोडके ,सतिश पाटील, संतोष हरवाळकर इत्यादींनी सहभाग नोंदविला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!