ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आमदार राम सातपुते यांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत

आमदार सचिन कल्याणशेट्टी : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात नागरिकांकडून जोरदार स्वागत

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यासह देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मत म्हणजे भारताचे विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मत आहे, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. पानमंगरूळ येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील, डॉ. अशोक हिप्परगी, भाजपचे तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, तालुका उपाध्यक्ष परमेश्वर यादवाड, शिवसिध्द बुळ्ळा, पान मंगरुळच्या सरपंच रत्नाबाई महाजन आदी उपस्थित होते. पानमंगरूळ गावामध्ये नागरिकांनी भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे पुष्पवर्षाव करीत फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले.

आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, काँग्रेसच्या काळात २७ वर्षांपासून रखडलेल्या पाण्याच्या योजनेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिला. शेकडो कोटी रुपये खर्चून गावागावांमध्ये रस्ते तयार केले. श्रीरामांचे मंदिर आणि गरिबांना घरे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळातच झाली आहेत. त्यामुळे सोलापूरकरांनी नरेंद्र मोदींना साथ द्यावी द्यावी.

आमदार राम सातपुते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब जनतेच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम केले. मोदींनी गरिबांना गॅस, घर, शौचालय, शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये, आयुष्यमान भारत योजनेतून ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले. मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. संघर्षातून यश मिळवले आहे. त्यामुळे सोलापूरकर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील हा विश्वास आहे, असेही आमदार राम सातपुते याप्रसंगी म्हणाले. परमेश्वर यादवाड यांनी प्रास्ताविक केले.

दरम्यान, गुरूवारी भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी गुरुवारी अक्कलकोट विधानसभेतील सुलेरजवळगे, चिंचोळी, केगाव, कुमठा, कोर्सेगाव, मुंढेवाडी, कल्लकर्जाळ, धारसंग, शेगाव, आळगे तडवळ, पानमंगरूळ, करजगी या गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांची संवाद साधला. यावेळी सर्व गावांमध्ये नागरिकांनी जोरदार स्वागत केले.

याप्रसंगी अक्कलकोट विधानसभा प्रमुख राजकुमार झिंगाडे, मल्लिकार्जून बिराजदार, महादेव मुडवे, विशाल दारफळे, श्रीशैल आहेरवाडी, गुरुपुत्र गदगे, दरेप्पा अरवत, पंचप्पा चरटे, काशिनाथ कोडते, लक्ष्मण पाटील, संतोष पाटील, बाबुराव पाटील, मल्लिकार्जुन पाटील, शिवयोगी स्वामी, अशोक मानशेट्टी, बाबुशा कोरपे, गुरू मुडगी, महेश हिंडोळे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!