---Advertisement---

महाप्रसादातून २०० जणांना विषबाधा तर एकाचा मृत्यू

By team
On: April 15, 2024 8:54 AM
Follow Us:
---Advertisement---

महाप्रसादातून २०० जणांना विषबाधा तर एकाचा मृत्यू

चंद्रपूर : वृत्तसंस्था

जिल्ह्यातील भद्रावती येथे नवस पूर्ण झाल्यानिमित्त महाकाली मंदिरात आयोजित महाप्रसादातून २०० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची घटना माजरी कॉलरी येथे घडली. यापैकी एकाचा मृत्यू झाला.

सविस्तर वृत्त असे कि, माजरी येथील बुल्लू राम यांनी नवस पूर्ण झाला म्हणून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. रात्री १०:३० वाजता जेवल्यावर अनेकांना उलट्या, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. हळूहळू रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. उपचारानंतर अनेकांना सुटीही देण्यात आली. तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!