छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उपचाराअभावी रस्त्यावर प्रसूती झालेल्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशनमध्ये या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामधील लासुर स्टेशन येथे एका आदिवासी महिलेची रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने भर रस्त्यामध्येच प्रसूती झाली. मात्र उपचाराअभावी नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर आणि कर्मचारी गैरहजर असल्याने बाळ दगावल्याची प्राथमिक माहिती आहे. सोबतच या महिलेला पुढील उपचारासाठी संभाजीनगरला हलवण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी या नवजात अर्भकला झाडाला बांधून ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली. यातच बालकाचा मृत्यू झाला. दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच गंगापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या बेरजबाबदारपणामुळेच कोणतीही सेवा मिळाली नाही शिवाय रुग्णवाहिका वेळेवर आली नसल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे