---Advertisement---

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत चपळगावमध्ये आज जाहीर सभा; महेश पाटील भाजपमध्ये जाणार

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट,दि.२७ : चपळगाव येथील काँग्रेसचे नेते व माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे समर्थक महेश पाटील यांचा आज भाजप प्रवेश होणार आहे.महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आज (शनिवारी) सायंकाळी चपळगाव येथे उमेदवार राम सातपुते आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेदरम्यान हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.महेश पाटील हे चपळगावच्या राजकारणात तर सक्रिय आहेतच पण त्यांचा दक्षिण सोलापूर व चपळगाव जिल्हा परिषद गटात मोठा जनसंपर्क आहे. त्याचा फायदा भाजपाला होणार आहे.ते माजी मंत्री बसवराज पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. बसवराज पाटील यांचा देखील नुकताच पक्षप्रवेश झालेला आहे.पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे चपळगाव जिल्हा परिषद गटात काँग्रेसला धक्का मानला
जात आहे.आगामी निवडणुकांमध्ये या भागातून भाजपाला मताधिक्य देण्याचा प्रयत्न माझा राहील. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचा विकास झपाट्याने होत आहे. त्यासाठी आपण पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाला गरज
आहे. देशात पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे.हा विचार डोक्यात ठेवूनच काँग्रेसला रामराम केल्याचे महेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!