---Advertisement---

दिलासादायक ! सोलापूर शहरातून कोरोना होतोय हद्दपार ; आज ९ रुग्ण आढळले

On: December 8, 2020 5:51 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : सोलापूर शहरात कोरोना हद्दपार होतानाचा दिसून येत. आज शहरातील 493 संशयितांमध्ये ९ नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. आज एकाचा मृत्यू झाला. सोलापुकरांच्या सतर्कतेमुळे आणि नियमांचे पालन केल्याने शहरातील रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे.

आतापर्यंत शहरात दहा हजार 541 कोरोना बाधित रुग्ण  आढळले आहे. त्यात एकूण  नऊ हजार 555 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात सध्या 414 रुग्णांवर उपचार सुरु आहे. शहरातील एक लाख 27 हजार 143 संशयितांची कोरोना टेस्ट  झाली.

शहरात आज बसवेश्‍वर नगर (एमआयडीसी रोड), बॉईज हॉस्टेल, आसरा चौक (होटगी रोड), पश्‍चिम मंगळवार पेठ, महालक्ष्मी नगर (विजयपूर रोड), भगवंत हौसिंग सोसायटी, नाकोडा रेसिडेन्सी (बुधवार पेठ), कन्नी नगर (दहिटणे) आणि अवंती नगरात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. रुग्णांच्या संपर्कातील 134 संशयित होम क्‍वारंटाईन असून 30 जण इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. तर 29 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

शहरातील रुग्णसंख्या कमी होऊ लागली असून आता संशयितांनी वेळेत उपचार घ्यावेत, जेणेकरुन कोणताही रुग्ण कोरोनाचा बळी ठरणार नाही, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, गर्दीत विनाकारण जाणे टाळावे, हात नियमित स्वच्छ धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, मास्क हनुवटीवर न ठेवता तो स्वच्छ करुन पुन्हा वापरावा असेही आवाहन महापालिकेतर्फे वारंवार केले जात आहे. त्यानुसार नागरिकांनी नियमित पालन केल्याने संसर्ग कमी होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!