---Advertisement---

एफआरपीची रक्कम १५ डिसेंबरपर्यत द्यावी ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

Follow Us:
---Advertisement---

 

सोलापूर, दि.८: जिल्ह्यातील साखर कारखान्याबाबत शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या एफआरपीबाबत तक्रारी आल्या आहेत. ज्या साखर कारखान्यांनी एफआरपीची काही टक्के रक्कम दिली आहे, त्यांनी उर्वरित रक्कम १५ डिसेंबर २०२० पर्यंत शेतकऱ्यांना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिले.

साखर कारखानदार, शेतकरी आणि शेतकरी संघटनेसोबत झालेल्या बैठकीत श्री शंभरकर यांनी हे निर्देश दिले. यावेळी प्रादेशिक साखर उपसंचालक पांडुरंग साठे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव आदी उपस्थित होते.

यावेळी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी देण्याची मागणी लावून धरली. यावर तोडगा म्हणून श्री शंभरकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची हिंसा, टायर पेटविणे, ट्रॅक्टर ची हवा घालवणे असे प्रकार होऊ नयेत. यासाठी कारखानदारांनी ताठर भूमिका न घेता सामंजस्य भूमिका घ्यावी. शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक करू नये.

अतिवृष्टी, कोरोना महामारीने शेतकरी अडचणीत आले आहेत, त्यांचा विचार करा. काही साखर कारखान्यानी एफआरपीचे ८५ टक्के पैसे दिले आहेत, उर्वरित रक्कम त्वरित द्यावी. कायद्याने जे निश्चित केले आहे ते कारखानदारांना द्यावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात सहकारी आणि खासगी अशा ३२ कारखान्यानी गाळप परवाना मागितला होता, ३० कारखाने सुरु झाले आहेत. सुमारे ४२ लाख मेट्रिक टन गाळप झाल्याची माहिती श्री साठे यांनी दिली. १७०० ते २४३१ पर्यंत एफआरपी दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!