ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये मतदानाची जय्यत तयारी

अक्कलकोट : प्रतिनिधी

लोकसभा निवडणूकीसाठी मतदानाची जय्यत तयारी प्रशासनाने केली असून, सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अक्कलकोट शहरात ४१ मतदान केंद्रे असून, त्यापैकी दोन मतदान केंद्र फक्त महिलांच्या अधिपत्याखाली कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. एक मतदान केंद्र मध्यवर्ती ठिकाणी शहाजी हायस्कूल येथे असन दूसरे मतदान केंद्र महिला मागासवर्गीय वस्तीगृहात करण्यात आले आहे.

प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष, एक सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष, दोन निवडणुक अधिकारी सहाय्यक आणि दोन पोलीस, पाच होमगार्ड याशिवाय पाच स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. मध्यवर्ती असणाऱ्या शहाजी हायस्कूल मतदान केंद्रात मंडप मारण्यात आला आहे. याशिवाय आरोग्य दूत, पाण्याची सोय आणि सेल्फी पॉईंट केला आहे मतदारांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंशसायात आले आहे इथे संपूर्ण मतदान प्रक्रिया महिलांच्या अधिपत्याखाली संपन्न होणार आहे. या मतदान केंद्राचा आढावा सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी खापरे, गोपनीय शाखेचे गजानन शिंदे, महादेव चिंचोळकर यांनी घेतला असून नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्यावर अक्कलकोट शहराच्या निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

अलीकडील घटलेल्या घटना पाहता अक्कलकोट शहर हे धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या तणावग्रस्त बनले आहे. यापूर्वी सतत घडणाऱ्या हाणामाऱ्या, दोन गटातील चालू असणारे भांडण यामुळे शहर संवेदनशील बनले आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार विनायक मगर आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी पोलिसासह राखीव पोलीस दल सज्ज ठेवले आहे. सध्या कडाक्याचा उन्हाळा यामुळे लवकरात लवकर मतदान व्हावे, यासाठी प्रशासन आणि दोन्ही पक्षाचे प्रमुख उमेदवार त्यांचे समर्थकासह प्रयत्नशील आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!