---Advertisement---

प्रख्यात अभिनेत्री चित्रा कामराज हिची आत्महत्या

On: December 9, 2020 11:41 AM
Follow Us:
---Advertisement---

चेन्नई । मनोरंजन जगातात आणखी एका अभिनेत्रीच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील प्रख्यात अभिनेत्री चित्रा कामराज हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. चित्राने चेन्नईतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी तिने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे चाहते हादरले आहेत.

 

चेन्नईतील नसरप्रीत भागात असलेल्या हॉटेलमध्ये चित्रा थांबली होती. या हॉटेलमध्येच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. चेन्नईतील प्रसिद्ध उद्योगपतीसोबत नुकताच तिचा साखरपुडा झाला होता. विजय टीव्हीवर सुरु असलेल्या पॅनडियन स्टोअर्स  या मालिकेतील तिची मुख्य व्यक्तिरेखा चांगलीच गाजत होती. चित्राने साकारलेली मुल्लई ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यातच चित्राने आत्महत्येसारखा निर्णय घेतल्यामुळे तिचे कुटुंबीय, सहकलाकार आणि फॅन्सही धक्क्यात आहेत.

नैराश्यातून आत्महत्येची चर्चा

चित्राला नैराश्याने ग्रासले असल्याचे बोलले जाते. त्यातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. धक्कादायक म्हणजे आत्महत्येच्या काही तास आधी तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट आणि स्टोरीही शेअर केले होते. त्यानंतर तिने आत्महत्येचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!