---Advertisement---

पुलवामा चकमकीत २ दहशतवादी ठार

On: December 9, 2020 12:00 PM
Follow Us:
---Advertisement---

श्रीनगर : सुरक्षादलांच्या जवानांनी आज बुधवारी पहाटे पुलवामा येथील टिकन गावात शोध मोहीम हाती घेतली होती. या दरम्यान  भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. याठिकाणी आणखी काही दहशतवादी लपून बसल्यामुळे चकमक अजूनही सुरुच आहे.

गेल्याच महिन्यात जम्मू-काश्मीरच्या नगरोटा परिसरात भारतीय लष्कराने मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला होता. या भागातून काही दहशतवादी मोठा शस्त्रसाठा घेऊन जात होते. त्यावेळी भारतीय लष्कराने जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बान टोलनाक्यावर त्यांचा ट्रक अडवला होता. यावेळी दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार झाला होता. या चकमकीत भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.

यंदाच्या वर्षात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झालेली ही दुसरी मोठी चकमक होती. यापूर्वी जानेवारी महिन्यात महामार्गावर झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!