मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात लोकसभेनिमित्त सर्वच पक्षाचे नेत्यांचा प्रचार जोरदार सुरु आहे. यात उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान पाकिस्तानाचा झेंडा फडकवण्यात आला असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नीतेश राणे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी एका व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा झेंडा दिसत आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, याचा उल्लेख राणे यांनी केलेला नाही. तसेच या व्हिडिओची सत्यता देखील तपासावी लागणार आहे.
या संदर्भात नीतेश राणे यांनी एका व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आल्याचे दिसून येत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या गटाचे निवडणूक चिन्ह असलेल्या मशाल याचा उल्लेखही या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याचा उल्लेख मात्र, नीतेश राणे यांनी केलेला नाही. लोकसभा निवडणूक सुरू झाल्यापासूनच महायुतीच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या मुस्लिम समाजाप्रती बदललेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यात आता पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आल्याने या प्ररकणाचे गांभीर्य आणखीनच वाढले आहे.
या संदर्भात आमदार नीतेश राणे यांनी एका पोस्टच्या माध्यामतून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ‘UBT च्या मिरवणुकित पाकिस्तान चा झेंडा ! आता काय PFI , SIMI, AL QAEDA चे लोक मातोश्रीत बिर्याणी घेऊन जातील… हे दाऊदचे मुंबईत स्मारक पण बांधतील..आणि म्हणे हा मा.बाळासाहेबांचा “असली संतान”’
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांना मुंबई दक्षिण-मध्यमधून तिकीट देण्यात आले आहे. त्यांच्या प्रचारादरम्याचा हा व्हिडिओ असल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्याची सत्यता पडताळावी लागणार आहे. या व्हिडिओ मध्ये ऐकू येत असलेल्या संवादानुसार मशाल चिन्हाचा तसेच अनिल देसाई यांचा उल्लेख करण्यात आला आहे. अर्थात हा व्हिडिओ सत्य आहे की बनावटी हे पाहावे लागेल.