ध्यास विश्वसार्ह बातमीचा

माढा लोकसभा मतदारसंघात कोण आघाडीवर ; मोहिते पाटील कि निंबाळकर

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील माढा लोकसभा मतदारसंघावर अनेकांचे लक्ष लागून असून याठिकाणी रणजितसिंह निंबाळकर निवडून येणार की, धैर्यशील मोहिते पाटील विजयी होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीत शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर आहेत. मोहिते पाटील हे 5000 अधिक मतांनी मोहिते पाटील आघाडीवर आहेत. तर भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर हे पिछाडीवर आहेत.

सुरुवातील पोस्टल मतांची मोजणी झाली. यामध्ये रणजितसिंह निंबाळकर आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. मात्र, पोस्टल मतदान झाल्यानंतर पहिल्या फेरीतील मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी आघाडीवर आहेत. साधारणत 5000 मतांनी मोहिते पाटील आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीतील मतमोडणीला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या फेरीत देखील मोहिते पाटील आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. सुरुवाचे काही कल हाती येत आहेत. अद्याप कोण विजयी किंवा कोणाचा पराभव हे निश्चित झालं नाही. सुरुवातीचे कल हाती येत आहेत. यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष माढा लोकसभा मतदारसंघाकडं लागलं आहे. त्यामुळं या मतदारसंघात कोण विजयी होणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!