मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून देशातील जनता महागाईने त्रस्त झाली असून आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून यात येत्या दोन दिवसात मोदी सरकार सत्ता स्थापन करणार आहे. सरकार स्थापन होण्यापूर्वीच या निकालादरम्यान टोल महाग झाला आहे. इलेक्ट्रॉनिक गोष्टींचे दर वाढले आहेत. तर दुधाचेही दर वाढवण्यात आले आहेत. आता दुधापाठोपाठ भाज्यांचेही दर वाढले आहेत.
निवडणुकीनंतर दिलासा मिळण्याऐवजी सर्वसामान्य लोकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. वाशी एपीएमसी बाजारात कांद्याच्या दराने पुन्हा उसळी घेतली असून मागील आठवड्याच्या तुलनेत प्रतिकिलो 2 ते 3 रुपयांची दरवाढ झाली आहे. एपीएमसीत प्रतिकिलो 22-25 रुपयांनी विक्री होणारे कांदे आता 25 ते 29 रुपयांवर पोहोचले आहेत.
कमी होत असल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. फरसबी, वाटाणासारख्या भाज्यांनी किरकोळ मार्केटमध्ये शंभरी ओलांडली आहे. कोथिंबीरचे दर होलसेल मार्केटमध्ये 60 रुपयांवर पोहोचल्याने सर्वसामान्यांच्या आहारातून कोथिंबीर गायब झाली आहे.