---Advertisement---

दादांना सांगा, मी आता बच्चा नाही ; रोहित पवार बरसले

By team
On: June 7, 2024 11:08 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान प्रचार आज करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांच्यावर टीका करताना तो बच्चा असल्याचे मत व्यक्त केले होते. तोच धागा पकडून आमदार रोहित पवार देखील प्रत्येक सभांमध्ये मी बच्चा आहे, पण मनका सच्चा आहे असे सांगत काका अजित पवारांवर टीका करत होते.

बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली, मतमोजणी झाली, प्रचारादरम्यान रोहित पवार यांनी प्रचंड कष्ट घेतले सगळी यंत्रणा उभारण्यापासून ते एका दिवशी 24- 24 सभा देखील त्यांनी घेतल्या. बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करत सुप्रिया सुळे यांना दीड लाखाहून अधिक मतांनी विजयी केले.
त्यानंतर आज आमदार रोहित पवार बारामतीत आले. बारामतीत आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले. प्रश्नाच्या ओघात अजित दादांच्या बच्चा असल्याचा उल्लेख रोहित पवारांनी केला आणि तेवढ्यात तो शब्द सावरून, त्यांनी आता मी बच्चा राहिलेलो नाही असे मिश्किलपणे सांगितले. आज बारामतीत रोहित पवार यांनी निवडणुकीदरम्यान मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची बुथ एजंट कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!