नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून आता येत्या दोन दिवसात नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे तर भारतीय रिझर्व बँकेने सलग आठव्यांदा रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. त्यामुळे आरबीआयकडून कर्जदारांना पुन्हा दिलासा मिळाला आहे. आरबीआयकडून पतधोरण जाहीर करण्यात आलं आहे. यात रेपो रेटमध्ये जैसे थे ठेवण्यात आलाय.
त्यामुळे आरबीआयचा रेपो रेट हा 6.50 टक्क्यांवर कायम आहे. रेपो रेटमध्ये कुठलाही बदल न करण्यात आल्यानं कर्जदारांच्या ईएमआयमध्ये कुठलीही वाढ होणार नाही. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयकडून हा निर्णय घेण्यात आलाय.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी सुरू झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) तीन दिवसीय बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती शुक्रवारी दिली. शक्तिकांता दास म्हणाले की, यासह एमपीसी सदस्यांनी किरकोळ महागाई लक्ष्याच्या अनुषंगाने आणण्यासाठी अनुकूल भूमिका मागे घेण्याचा निर्णय कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
रेपो दर 6.5 टक्के कायम ठेवणे म्हणजे घर, वाहन यासह विविध कर्जावरील मासिक हप्त्यात (EMI) बदल होण्याची शक्यता कमी आहे. केंद्रीय रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी २०23 मध्ये रेपो दरात शेवटची वाढ केली होती. या वाढीनंतर रेपो दर 6.5 टक्के करण्यात आला. यानंतर केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची सलग 8 वेळा बैठक झाली. बँका रेपो रेटच्या आधारे कर्जाचा व्याजदर ठरवतात.
शक्तीकांत दास म्हणाले की, आरबीआयचा अंदाज आहे की आर्थिक वर्ष 2025 साठी वास्तविक जीडीपी 7.2 टक्के असू शकतो. जीडीपी पहिल्या तिमाहीत 7.3 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 7.2 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 7.3 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 7.2 टक्के वाढू शकतो.
महागाईचा दर ४.५ टक्केच
मागील MPC प्रमाणे, आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाईचा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे. RBI ने FY 2025 साठी CPI महागाई 4.5% असण्याचा अंदाज वर्तवला आहे. पहिल्या तिमाहीत महागाई 4.9 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 3.8 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 4.6 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 4.5 टक्के असू शकते, असा RBIचा अंदाज आहे.