---Advertisement---

ग्लोबर टीचर रणजीतसिंह डिसलेंना कोरोनाची लागण ; मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची घेतली होती भेट

On: December 9, 2020 7:54 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई । ग्लोबर टीचर रणजीतसिंह डिसले यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. डिसले यांना कोरोनाची लक्षणे दिसल्याने त्यांनी कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. रणजीतसिंह डिसले यांनी आपल्या WhatsApp स्टेटसमार्फत स्वतः याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, नुकतीच रणजीतसिंह डिसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

“मला लक्षणे दिसत असल्याने मी कोविड टेस्ट करुन घेतली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे, माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांनी देखील कोरोनाची चाचणी करुन घ्यावी”, असे आवाहन रणजितसिंह डिसले यांनी केले आहे. दरम्यान, डिसले पती-पत्नी दोघांचेही अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले असून इतर कुटुंबीयांची चाचणी नकारात्मक आल्याची माहिती मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!