पुणे : वृत्तसंस्था
मान्सूनचा प्रवास थांबला असून, पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पोहोचण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील चार दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा कायम आहे. काही भागांत यलो अलर्ट आहे. दरम्यान, रविवारी पावसासह ऊन-सावलीचा खेळ राज्यात पाहायला मिळाला, तसेच पावसाचा जोर कमी होता.
मान्सून संपूर्ण कोकण, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत तसेच विदर्भातील अमरावती आणि चंद्रपूरपर्यंतच्या भागापर्यंत पोहोचला आहे. गेले तीन दिवस मान्सूनची चाल मंदावली आहे. खान्देश, पूर्व विदर्भात मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. मान्सूनची उत्तरी सीमा कायम मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे. रविवारी मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भातील तुरळक भागांत पाऊस पडला. पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका वाढला. रविवारी विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४१.२ अंश तापमानाची नोंद झाली.