---Advertisement---

सोलापुर : दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा !

By team
On: June 17, 2024 9:04 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

बालकाचा दफनविधी केल्यानंतर तिसऱ्या दिवशीच्या विधीसाठी आलेल्या बालकाचा मृतदेह गायब झाल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी बाळाचे पिता राहुल वाघमारे यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शोध सुरू केला. प्रियांश राहुल वाघमारे (१० महिने) असे मृत बालकाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे कि, राहुल वाघमारे यांचा १० महिन्यांचा मुलगा प्रियांश याला डोक्याला मार लागून रक्तप्रवाह झाल्याने त्याला उपचारासाठी शहरातील एका खासगी दवाखान्यात दाखल केले होते. उपचारादरम्यान १४ जून रोजी त्याचा मृत्यू झाला. नातलगांनी मोदी स्मशानभूमीत त्याच्यावर खड्डा खोदून अंत्यसंस्कार केले होते. सुरक्षेच्या दृष्टीने खड्डा बुजवून त्यावर फरशी, दगड, काटेरी झुडूप ठेवले होते. रविवारी बाळाच्या आई-वडिलांसह नातलग मोदी स्मशानभूमीत पोहचले. येथे बाळाला ज्या ठिकाणी दफन केले होते, तो खड्डा उकरलेला होता. त्याचा मृतदेहही गायब होता.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!