ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंतप्रधान मोदींनी घेतली टीम इंडियाची भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

टी-20 विश्वचषक २०२४ ची स्पर्धा जिंकून टीम इंडिया आज मायदेशी परतली. यानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू, प्रशिक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. टीम इंडिया आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यानचा व्हिडीओ आता समोर आला आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांनी विश्वचषक ट्रॉफी आणि सर्व खेळाडूंसह फोटो काढला. तसेच विश्वचषकातील काही आठवणी नरेंद्र मोदी सांगताना टीम इंडियाचे खेळाडू व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सर्व खेळाडू दिल्ली विमानतळावर दाखल झाले. मुंबईसाठी रवाना होण्यासाठी टीम इंडिया दिल्ली विमानतळावर दाखल झाली आहे. भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे विशेष स्थान आहे. याच स्टेडियमवर भारताने 2011 सालचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक उंचावला होता. आता, याच स्टेडियमवर आज भारताच्या टी-20 विश्वविजेत्या संघाचाही सन्मान होणार आहे.

सध्या मुंबईत महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान भारतीय संघांचे मुंबईतील खेळाडू रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या (5 जून रोजी) भेट घेणार आहे. यावेळी विधीमंडळाच्या सभागृहात या खेळाडूंचा खास सत्कार करण्यात येणार आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज माहिती दिली. यासंबंधीचे निमंत्रण या खेळाडूंना देण्यात आलं आहे. यावेळी सर्व पक्षाचे आमदार उपस्थित रहावे यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे विनंती करणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!