ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेअर बाजार सावरला, सेन्‍सेक्‍समध्‍ये अकांची झाली वाढ

मुंबई : वृत्तसंस्था

आशियाई बाजारातील घसरणीमुळे भारतीय बाजारातही सोमवारी दि.८ काही प्रमाणात कमकुवत स्थिती दिसून आली होते. सेन्सेक्स ३६ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७९,९६० वर तर निफ्टी २४,३२० वर बंद झाला होते. बँकिंग शेअर्समधील घसरण याला कारण ठरले होते. मात्र आज ( दि. ९ जुलै) देशांतर्गत शेअर बाजारात हिरव्या रंगात व्यवहार सुरू झाले. बाजारात व्‍यवहाराला सुरुवात हाेताच सेन्सेक्स १४७ अंकांनी वधारला तर निफ्टीमध्ये किंचित वाढ नोंदली गेली.

आज व्‍यवहाराची सुरुवात होताच सेन्सेक्स 147 अंकांनी वाढून 80,107 वर उघडला. निफ्टी 31 अंकांनी वाढून 24,351 वर तर बँक निफ्टी 35 अंकांनी घसरून 52,390 वर उघडला. मारुती सुझुकी, ब्रिटानिया आघाडीवर होते. आणि एफएमसीजी शेअर्समध्ये आजही वाढ दिसून आली.

१३४६ शेअर्स वधारले
मिडकॅप निर्देशांक 0.47 टक्क्यांनी मजबूत झाला. मात्र, निफ्टी निर्देशांक बाजाराच्या सुरुवातीला कमजोरीसह उघडला. आज बाजारात सुरुवातीच्‍या व्‍यवहारात १३४६ शेअर्स वाढीसह व्यवहार करताना दिसले. तर 304 समभाग घसरणीसह व्यवहार करताना दिसून आले. निफ्टीचे जवळपास सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!