---Advertisement---

४ प्रेयसींचा हट् पुरविण्यासाठी तरुणाने जे केले ते धक्कादायक

By team
On: July 9, 2024 2:36 PM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

प्रेमात सारं काही माफ असतं असं म्हणतात.. पण गुन्हा तो गुन्हाच.. कितीही काहीही केलं तरी कायद्याच्या वर कुणालाही जातं यत नाही.. मग ते प्रेम असो वा दुसरं काही.. छत्रपती संभाजीनगर येथे एका तरुणाने एक नव्हे दोन नव्हे तर आपल्या ४ प्रेयसींचा हट्टाचा भार पुरवण्यासाठी चक्क २५ दुचाकी चोरल्याची घटना पोलीस तपासात उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे कि, येथील बीएससी कॉम्पुटरचे शिक्षण झालेल्या तरुणाने तब्बल २५ दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले आहे. या दुचाकींची चोरी ४ गर्लफ्रेंडचे हट्ट पुरवण्यासाठी केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली. आदित्य राजेंद्र मोहिते असे या दुचाकी चोरी करणाऱ्या तरुणाचे नाव असून हरसूल पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे. आदित्य मोहिते यास एक नव्हे तर चार मैत्रिणी होत्या. या चारही मैत्रिणीकडून आदित्यकडे वेगवेगळ्या गोष्टींसाठी हट्ट केला जात होता. मात्र या ४ गर्लफ्रेंडचे हट्ट पुरविण्यासाठी खिशात पैसे नसल्याने पैशाची गरज भासू लागली. यातून त्याने दुचाकी चोरी करण्यास सुरवात केली. मास्टर कीचा वापर करून अवघ्या २१ वर्षाच्या या तरुणाने चक्क २५ दुचाकी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

 

 

शहरातून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस या दुचाकी चोराच्या मागावर होते. दरम्यान हर्सूल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काही दिवसापूर्वी एक दुचाकी चोरीला गेली होती. तिचा शोध घेता घेता या आरोपीचे सगळं गौडबंगाल समोर आल. हरसूल पोलिसांनी दुचाकी पळविणाऱ्या सराईत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर त्याच्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू असून त्याच्याकडून १४ दुचाकी हर्सूल पोलीसांनी हस्तगत केल्या आहेत. तर दुचाकी चोरीची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!