ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रेल्वे रुळांवर साचले पाणी ; दोन गाड्या रद्द, देशात पावसाचे वादळ !

मुंबई : वृत्तसंस्था

देशातील अनेक राज्यात पावसाचा कहर सुरु असतांना गुजरातच्या सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. द्वारकाच्या पनेली गावात पुरात अडकलेल्या 3 शेतकऱ्यांची हवाई दलाने हेलिकॉप्टरद्वारे सुटका केली. द्वारका येथे 12 तासांत 281 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजही येथे मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.

त्याचवेळी मुंबईत गेल्या 24 तासात 200 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईत भरती-ओहोटीमुळे समुद्रातही उंच लाटा उसळल्या. आज येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे मध्यप्रदेशातही मुसळधार पाऊस सुरू आहे. सिवनी जिल्ह्यात रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने सोमवारी सायंकाळी दोन पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या. हवामान खात्याने मंगळवारी (२३ जानेवारी) ९ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा आणि 10 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!