आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यभर प्रामाणिक राहा
नागनहळळी आश्रमशाळेत शिक्षण सप्ताहाचा समारोप
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
विदयार्थ्यांचा पहिले गुरु म्हणजे आई वडिल असून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यभर प्रामाणिकपणे कार्य करत रहा, असे आवाहन सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एडवोकेट शरद फुटाणे यांनी केले.रविवारी,तालुक्यातील नागनहळळी आश्रम शाळेत शिक्षण सप्ताहाचा समारोप करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.
शिक्षण विभागातर्फे दि.२२ जुलै ते २८ जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने समुदाय सहभाग अंतर्गत विदयाजंली व स्नेहभोजन असे उपक्रम साजरे करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट शरद फुटाणे संस्थेची शालेय इमारत, प्रयोगशाळा व वसतिगृह विभाग यामधील गरीब व होतकरु विदयार्थ्यांना मिळणा-या सुविधा याबददल संस्थेविषयी गौरवदगार काढले. यावेळी संस्थेचे सचिव जावेद पटेल,माजी मुख्याध्यापक मोहन चव्हाण, पत्रकार मारुती बावडे, स्वामीराव गायकवाड, राजेश जगताप, उदयोजक विक्रम फुटाणे प्राचार्य आय.एम.मुजावर, मुख्याध्यापक रईसअहमद शेख आदींची उपस्थिती होती.
शिक्षण सप्ताह अंतर्गत नागनहळळी आश्रमशाळा संकुलात पहिल्या दिवशी अध्ययन अध्यापन साहित्य निर्मिती कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले.दुस-या दिवशी निपुण प्रतिज्ञा गणितीय परिपाठ व तज्ञांची माहिती विदयार्थ्यांना करुन देण्यात आली.तिस-या दिवशी क्रिडा दिवस साजरा करण्यात आला. चौथ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला.पाचव्या दिवशी कौशल्य व डिजिटल व सहाव्या दिवशी इको क्लबची स्थापना, वृक्षारोपन व शालेय पोषाण आहार या विषयी माहिती देण्यात आली. प्रशालेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आनंदी वातावरणात उपक्रमाचे आयोजन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन गुरव यांनी तर आभार शिवाजी चव्हाण यांनी मानले.